कथा तुळशी विवाहाच्या

  • 8.3k
  • 2.5k

कथा तुळशी विवाहाच्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणा विषयी कथा आहेत ज्या पुराणाशी संदर्भित आहेत .तुळशी विवाह संबंधी असलेल्या काही कथा जाणून घेऊ या कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. यावर तोडगा म्हणून एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली. एकदा एका गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने स्त्री वेष