मित्र my friend - भाग ३

  • 10.4k
  • 5.1k

या .... विवेकला बघून इन्स्पेक्टर बोलले. काय झालं साहेब ? विवेकने खुर्चीवर बसत विचारले. चल चल बसू नकोस.... इन्स्पेक्टर उभे राहत म्हणाले. विवेकला मागोमाग यायला सांगून एका खोलीत शिरले. जखमींवर उपचार करायची खोली ती... विवेकने डोकावून पाहिलं आत. च्यायला !! हि तर प्रिया.... हि इकडे कशी.. ? विवेक ओरडलाच.. तुझ्या मैत्रिणीला जीव देयाची एवढी घाई आहे का... इन्स्पेक्टरने विचारलं. म्हणजे ? विवेक... म्हणजे... समुद्रकिनारी... जिथे तुम्ही दोघे सापडला होतात , तिथे... या बाईसाहेब... उभ्या होत्या कठड्यावर... नशीब, आमचा एक हवालदार होता तिथे.. त्याला बघून उडी मारली पाण्यात... बरं