आम्ही अंबेचे गोंधळी

  • 14.9k
  • 4.5k

आम्ही अंबेचे गोंधळी . गोंधळ किंवा जागर ही महाराष्ट्रातली एक पारंपारिक प्रथा आहे गोंधळी ही देवीच्‍या भक्‍तांची भटकी जात आहे. गोंधळ हा लग्‍न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी देव – देवतांच्‍या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे.लग्न समारंभ , नवीन घर बांधणे किवा विकत घेणे या शुभ समयी सुद्धा आपल्याला होणाऱ्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी व देवीच्या आशीर्वादासाठी गोंधळ हा कार्यक्रम ठेवतात.प्रती वर्षाला घरी अथवा कुलदैवताच्या ठिकाणी गोंधळ घालण्याची पण प्रथा असते .महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे पारंपरिक/ विधिनाट्य सादर करतात. या जातीचे लोक महाराष्‍ट्र, कर्नाटक, मध्‍यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या प्रांतात विशेषेकरून आढळतात. गोंधळी हे देवीचे उपासक असून