स्वराज्यकार्याची संधी - भाग ४

  • 6.7k
  • 3.2k

भाग ४ - स्वराज्यकार्याची संधी प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. समोर धुरळा उडाला, शिवाला हे अनपेक्षित होतं. अन त्याच क्षणी त्याच्या कमरेला कुणीतरी विळखा घालून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करू पाहत होतं. अन झालंही तसंच मावळ्याने शिवाला पायात पाय घालून जमिनीवर पालथा पाडला अन त्याच्या पाठीवर बसला. शिवाचे दोन्ही हात धरून त्याला पाठीवर कलवण्याचा प्रयत्न करू लागला. शिवाच्या नाका तोंडात माती जाऊ लागली. एक दोन वेळा मावळ्याने शिवाला फिरवण्याचा प्रयत्न केला. शिवाही जोर लावून त्याला प्रतिकार करत होता. त्याची