राजगडावर आगमन - भाग ५

  • 6.4k
  • 3.1k

भाग ५ - राजगडावर आगमन प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. रात्रभर पारू शिवाच्या कुशीत मुसमुसत होती. पहाट होऊ लागली होती. पारूची मैत्रीण पलीकडच्या बांधावर असलेल्या दगडावर पेंगत होती. शिवाच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवत पारू अलग झाली. दोघांचेही डोळे पाण्यानं डबडबले होते. एकमेकांशिवाय एक दिवसही न राहू शकणारे शिवा पारू, आता पुनःभेटीसाठी किती दिवस लागतील, या विचाराने व्यतिथ झाले होते. पारुने पुन्हा शिवाला मिठी मारली अन हमसाहमशी रडू लागली. शिवाने तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये पाहिलं.हातांनी डोळे पुसले अन म्हणाला, "अगं वेडाबाई.. मी