जुळले प्रेमाचे नाते - भाग-१२

(24)
  • 10.5k
  • 5.6k

छान प्रवास चालु होता. निशांत गाडी चालवत होता आणि मी बडबड करत होते.. काय आहे ना मी झोपले तर निशांत ही झोपायचा मग आम्ही कोकणात नाही ढगात पोहोचायचो... छान पहाट होत होती.. मी पहिल्यांदाच अशी पहाट अनुभवत होती... आम्ही आता कोकणच्या रस्त्याला लागलो असल्याने दुतर्फा झाडं आणि मधुन रस्ता... पण काळोखामुळे काही दिसत नव्हतं हे वेगळं. मी अंदाज लावत होते सगळ्याचा. जसे आम्ही पुढे जात होतो.., तो झोपलेला सूर्य उठण्याच्या तय्यारीत दिसत होता. त्याचा तांबडा-पिवळा रंग आकाशात पसरत होता.. माझी आणि निशांतची झोप झाल्याने आम्ही सकाळचा सूर्योदय बघण्यासाठी गाडी बाजुला लावत होतो. गाडी बाजुला लावून दोघे उतरलो. निशांतने रस्त्याच्याकडेला