४ वर्षांनी येत होता तो. किती बदल झाला .त्यात गेल्या वर्षीच घराची डागडुजी केली होती, विवेकनेच तर पैसे पाठवले होते. ते घर आता कसं दिसते ते बघायला विवेक उत्सुक होता.. घराजवळ पोहोचला तेव्हा वेगळाच नजारा. जरासं तुटक घर... आता एक मजली झालं होतं. व्वा !!! कमाल केली यांनी... घराचा आकार सुद्धा वाढवला.. आजूबाजूला झाडे देखील लावली होती. एकदम कायापालट... अनघा तर त्याच्या आधीच धावत घरी पोहोचली होती.. अनघा, आई एकत्र दारात उभ्या होत्या. विवेकलाही आईला बघून बरं वाटलं. डोळ्यात पाणी आलं दोघांच्या.. गळाभेट झाली. पाया पडून झालं. अनघा तितक्यात जाऊन आली कुठेतरी. विवेक घर न्याहाळत होता. किती सुधारणा केली... सुरेख