मित्र my friend - भाग ८

  • 7.2k
  • 2.9k

बघता -बघता संध्याकाळ झाली. रात्रीचे ८ वाजले होते, तेव्हा विवेक घरी आला.बऱ्याच वर्षांनी एवढा निवांत वेळ मिळाला होता त्याला. बघतो तर प्रिया अजूनही त्याच्या घरीच... रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झालेली. त्यात प्रियादेखील मदत करत होती. हिला काय बोलू आता... स्वतःच घर सोडून आली आहे....त्याचं काहीच नाही, ठेवणार कुठे हिला.. विवेक आत आला आणि काहीतरी खूण करून त्याने प्रियाला बाजूला बोलावलं. " काय चालू आहे तुझं ? ", " मस्त बेत आहे तुझ्यासाठी... सॉलिड जेवण बनवलं आहे तुझ्यासाठी ..... ", " जेवणाचे नाही विचारलं... तुझ्या राहण्याची सोय काय...... आता तर रात्र पण झाली.. " तेव्हा प्रियाच्या डोक्यात प्रकाश पडला, घाबरली.