सकाळच्या सूर्याच्या किरणांनी माझी सकाळ एकदम फ्रेश झाली. आज मला लवकरच जाग आली होती.. घडाळ्यात पहिल तर सकाळचे सात वाजले होते.. स्वतःशीच हसत मी उठले... जाऊन खितकीत बसले.., तो समोरचा समुद्र आणि त्याच्यासोबत वर येऊ पाहणारा सूर्य जणु मला गुड मॉर्निंग विश करण्यासाठीच एकत्र उठल्या सारखे वाटत होते.. त्यांना बघून मला ही त्यांना विश करावस वाटलं. थोडावेळ बसुन मग मी फ्रेश होण्यासाठी गेले.. फ्रेश होऊन खाली आले तर कोणीही उठल नव्हतं... चक्क नोकर ही घरी दिसत नव्हते. मग मीच सर्वांसाठी कडक चहा आणि गोड शिरा करायचा ठरवला. गॅसवर चहाचे पातेले ठेवले आणि सगळं सामान शोधु लागले.. कस तरी चहाचे सामना