पुन्हा रस्सीखेच.. " तुमच्या लफड्यात मला कशाला मध्ये ओढता... जा ना तू एकटी... ",अजूनही विवेक त्याचा हात सोडवू शकला नव्हता. " तुला यावंच लागेल... समजलं ना.. " प्रिया मोठयाने ओरडली. तिचा आवाज ऐकून अनघा दुकानातून बाहेर आली. " कुठे चालली आहेस ? ", " दिल्लीला.. ", " कशाला एवढ्या लांब.. " अनघाचा लगेच दुसरा प्रश्न.. " त्याचा एक काम असा... दिल्लीक... तुका जाऊचा असा काय दिल्लीक... " संदीप " वेगळ्या " भाषेत बोलला. "मग दादाला काय झालं... ", "याला बोलते कि चल ना माझ्यासोबत... मी एकटी कशी जाऊ... तर नाटक करतो आहे.. " प्रिया रडक्या आवाजात बोलली. " जाईल तो...