शर्थ - भाग ८

  • 5.9k
  • 2.1k

भाग ८ - शर्थ प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. येसाजींनी घडलेला प्रसंग सान्गायला सुरुवात केली. 'येसाजींबरोबर असलेले पन्नास एक मावळे चारा भरलेल्या वीस पंचवीस बैल गाड्या घेऊन पुण्यात घुसले. अन मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसले. ठरलेल्या वक्ताला हर हर महादेव च्या आरोळ्या घुमू लागल्या. राजांपाठोपाठ येसाजी अन त्याचे मावळे, लाल महालात घुसले. एकच कापाकापी सुरु झाली. समोर येईल त्याला कापलं जात होतं. सगळीकडे आरडा ओरडा, गोंधळ अन पळापळ चालू होती. शिवा महालाखाली येणाऱ्या शत्रू सैन्याला सपासप कापून काढत होता.