चांदणी रात्र - ११

  • 8.1k
  • 2.5k

रात्री सात वाजता संदीप, मनाली आणि वृषाली कॉलेजात पोहोचले. वृषालीने मनालीला राजेशबद्दल विचारलं. तो ठीक असल्याचं मनालीने सांगितलं. तसेच आता फक्त तुझ्या गाण्यावर लक्ष दे असा सल्लाही तिने वृषालीला दिला. एकूण चार मुलं आणि चार मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. होस्टने घोषणा करताच पहिला स्पर्धक विक्रांत स्टेजवर आला. तो किशोर कुमारचं ‘पल पल दिल के पास’ हे गाणं गाणार होता. त्याने हातात माईक धरला व गाणं गायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे सूर चुकत होते. त्याची देहबोली पाहून त्याला स्टेजवर गायची फारशी सवय नसावी असं वाटत होतं. गाण्याच्या उत्तरार्धात त्याने स्वतःला सावरलं. गाणं संपलं. सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला. सुरुवातीला त्याचा सूर जरी