मित्र my friend - भाग १०

  • 7k
  • 2.9k

मुंबईला पोहोचले तेव्हा पहाट झालेली. पहाट म्हणजे १० वाजत आलेले. आता ऑफिसमध्ये जाऊन फायदा नाही , म्हणत विवेकने त्याच्या "भाडयाच्या" रूमवर जाण्याचा निर्णय घेतला. पोहोचले हि घरी... " Wow !! that is room... gorgeous.... is the.." संदीप , विवेकच्या राहत असलेल्या रूममध्ये येत म्हणाला. विवेक तसाही वैतागला होता, रात्रभर या दोघांची बडबड ऐकून.... आता पुन्हा संदीपने बोलणं सुरू केलं आणि विवेकने स्वतःच डोकं धरलं. " काय झालं रे विवेक बाळा ? " प्रियाने लाडिक आवाजात विचारलं. " डोकं... तुमच्या दोघांच्या बडबडीमुळे झोप लागली नाही... त्यामुळे डोकं दुखते आहे... " विवेक डोक्याला हात लावून बसला होता. " आता कसलं डोकं