कृष्णकन्हैय्या

  • 3.9k
  • 1.3k

कृष्ण कन्हैय्या कृष्णाचे त्यांच्या जवळील प्रत्येकासोबत एक विलक्षण नातं होतं. तो कुणाचा पुत्र, कुणाचा मित्र, कुणाचा सखा, कुणाचा गुरू तर कुणाचा भाऊ होता. मात्र या प्रत्येक नात्यात अद्भूत रहस्य दडलं होतं. महाभारतात कृष्णावर प्रेम करणारी अशी अनेक होती नाती आजही अजरामर आहे. कृष्णभक्तीच्या महान नात्याचे पदर असे आहेत . कृष्ण आणि देवकी कृष्ण हा देवकी आणि वसुदेवाचा मुलगा होता. मात्र कंसांच्या भीतीने देवकी आणि वसुदेवाने कृष्ण जन्मानंतर लगेचच त्याला गोकुळात यशोदा आणि नंदाकडे सुपूर्त केलं होतं. त्यामुळे देवकीला तिच्या बाळाला त्याच्या जन्मापासूनच स्वतःपासून वेगळं ठेवावं लागलं. एखाद्या मातेसाठी तिचं बाळ हे सर्वात महत्त्वाचं असतं. बाळाला जन्मापासून स्वतःपासून वेगळं करणं हे नक्कीच