मित्र my friend - भाग १२

  • 5.9k
  • 1
  • 2.6k

सकाळ होताच , बँक उघडताच संदीपचे पैसे देऊन आणि प्रवासात , दिल्लीला गेल्यावर पैश्याची अडचण भासू नये म्हणून त्याने आणखी पैसे काढले. पहिल्यांदा विमान प्रवास म्हणून प्रिया ,संदीप खुश... विवेक मात्र वेगळ्या विचारात... कसली चुकीची कामं करतो आहे केशव.. प्रियाला खरंच माहिती असेल, त्याच कारणास्तव आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असेल का... कि काहीच माहित नाही तिला... सांगावं का तिला.. कि दिल्लीला तिलाच खरं काय ते कळेल.. धक्का तर नाही ना बसणार तिला.. काय करू... विवेकचं लक्ष लागत नव्हतं. विमानात बसल्यावर सुद्धा विवेकला काही समजत नव्हतं, तिथे गेल्यावर काय होईल नक्की ते... " ये.. पाऊस.. पाऊस सुरू झाला.. " प्रियाच्या