रंग हे नवे नवे - भाग-4

(17)
  • 20.8k
  • 10.7k

'तू ह्यातच करियर का नाही करत?', विहानने तिला विचारलं. 'हे मी फक्त आवड म्हणून करते आणि वेळही मिळत नाही हल्ली.' 'मला वाटत की तू एक उत्तम कलाकार आहेस आणि ते तू जपायला हवं. मला पण खूप आवड आहे, पण मला कधी ती आवडही जपता नाही आली, पण आता मी चालू केल आहे पुन्हा आणि मी खरच खूप आनंदी आहे. तू पण ते पुढे चालूच ठेवावं अस मनापासून वाटतंय मला.', विहान तिला म्हणाला. आज पहिल्यांदा मैथिलीला कुणीतरी आपल्या आवडीच्या विषयात करियर कर असा सल्ला देत होतं आणि तिला हे खूप छान वाटलं. 'चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून. नक्की विचार करेन मी ह्या गोष्टीचा.',