" तू कोण ठरवणार केशव बरोबर नाही ते... तू नाही ओळखत त्याला.... खरं सांगायचं झालं तर, तूच त्याचा तिरस्कार करतोस... कॉलेजमध्ये असल्यापासून... तेव्हा सुद्धा सांगायचा तू... केशव सोबत राहू नको म्हणून.. तो तुझ्यापेक्षा पुढे गेला म्हणून जळतोस त्याच्यावर... आणि हो... उपकारच केलेस माझ्यावर...मित्र आहेस ना... मित्रच रहा.. देव बनण्याचा प्रयन्त करू नकोस... ", " प्रिया !!! " विवेकचा हात उठला प्रियाला मारायला.. पुन्हा विजेचा जोरदार आवाज झाला.. थांबला विवेक तसाच. संदीप दारात उभा राहून बघत होता हे सर्व. " ok... fine... उपकार केले ना...ठीक आहे... उद्या सकाळीच त्याला भेटायला जाऊ... हा शेवटचा उपकार केला कि माझी जबाबदारी संपली... "