फिरून नवी जन्मेन मी - भाग ५

(11)
  • 16.2k
  • 7.5k

मी प्रतिकार करायच्या आत पाठीमागून येणारा बारीक आवाज कानावर पडला..." शुssssssssssss....इथच थांब... एकही पाउल पुढ टाकु नग..आन काय बी बोलू नग..." आवाज ओळखला तस मी गर्रर्रर्रर कन मागे फिरलो..." ग........ग.....गौरी......तु..."तीला पहाताक्षणी तीला गच्च मीठी मारली, माझ्या डोळ्यातुन घळाळा आनंदाश्रु वाहु लागले... ती ठीक होती.. दुस-याक्षणी मनात विचार आला, मग ती जखमी आहे ती कोण...? तसच समोर पाहिल. ती जख्मी अवस्थेत पडलेली मुलगी गाडीचा स्टर्टर लागावा तशा आवाजासारखी हसत उठुन उभी राहीली. र्खी खी खी खी करत तीीच हसण ऐकून जसं डोकच बधीर होऊ लागल.. क्षणाक्षणााााला तीचा विद्रुप होऊ लागला तसा मी हादरलो...गौरीन माझा हात मागे ओढला आणि आम्ही दोघे गावाच्या दिशेने धावत