बंदिनी.. - 10

  • 11.7k
  • 4.6k

..... तशाही स्थितीत मी स्वतःशीच हसले... आणि म्हणाले.. नाही येणार तो परत! त्याला त्याचं प्रेम मिळालंय..!! मी आणि तन्वी आमच्या स्टॉप वर उतरलो.. चालता चालता बोलायचं म्हणून बोलत होते मी तिच्याशी.. मी नॉर्मल असल्याचंच तिला दाखवत होते..माझ्या आयुष्यात काय उलथापालथ झाली होती याची ना तिला खबर होती.. ना अनय ला...! आज पाऊस एवढा होता की छत्री असूनही आम्ही अर्धेअधिक भिजलो होतो.. छत्री फक्त नावालाच उरली होती हातात... घरी पोहोचले तर दाराला कुलूप... मग लक्षात आलं की आई पप्पा मुख्य मार्केट मध्ये जाणार होते काही खरेदीसाठी.. आई पप्पा पण ना.. आजचाच दिवस भेटला का ह्यांना जायला..? पाऊस किती लागलाय..