चांदणी रात्र - १४

  • 7.7k
  • 1
  • 2.3k

सकाळी उठताच राजेशने पटापट आवरलं. आज त्याच्या मनात एक वेगळीच हुरहूर, एक वेगळाच उत्साह संचारला होता. खरंतर कालची निम्मी रात्र तो जागा होता पण थकवा बिलकुल जाणवत नव्हता. संध्याकाळी काय काय करायचं याची त्याने मनात उजळणी केली व वृषालीला फोन लावला. आज संध्याकाळी सहा वाजता टेकडीवर ये, तुला काहीतरी सांगायचंय असं राजेशने वृषालीला सांगितलं व फोन ठेवला. राजेश संध्याकाळी साडेपाच वाजताच टेकडीवर पोहोचला. अजून सूर्यास्त व्हायला बराच वेळ होता. उन्हाळ्याच्या दिवसात उगवणाऱ्या रान फुलांनी सारी टेकडी बहरली होती. पांढऱ्या पाकळ्या व पिवळ्या रंगाचे परागकण असलेली ती फुले अतिशय मोहक दिसत होती. राजेशने बरीच फुलं पटापटा खुडली व एका पिशवीत भरली व