* दंड की भुरदंड! * शहरातील एक मध्यवर्ती भाग! त्या भागाला शहराचा आत्मा 'हर्ट ऑफ द सिटी' असे समजण्यात येत असे. नगरातील फार मोठी बाजारपेठ असल्यामुळे ती वसाहत सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत कायम गजबजलेली असे. धावपळ ही तेथील नित्याचीच बाब. नुकतेच बाप्पाचे आगमन झाले होते आणि महालक्ष्मीचा सण तोंडावर होता. कोणताही सण म्हटलं की, त्या भागातील गर्दी आटोक्यात आणणे फार मोठे कठीण काम होते. तिथे पोलिसांची तुकडी कायम तैनात असे परंतु शेवटी गर्दी ती गर्दीच! तिला ना चेहरा