भरकटलेली

  • 8k
  • 3.7k

ती तिच्या आईबापाला झालेली चौथी मुलगी. अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या त्याच्या घरी वंशाच्या दिव्याच्या नादात पणत्यांची रांग लावली होती.आधीच घरी दारिद्र्य, मोलमजुरीवर चालणार पोट,त्यात सततच्या बाळंतपनामुळे तिची आईचा वाढता अशक्तपणा,तिची काम करण्याची असमर्थता.बापाच्या कमाईचा पैसा दारू आणि जुगारावर उधळून संपला तरच घरी यायचा मग उपवासाचीच संगत जास्त.आपल्या पोटाला आधार मिळावा तर आपले अनवाणी पाय झिजवावेच लागतील हे सत्य त्या पोरींनी अगदी कोवळ्या वयातच स्वीकारल होत. पोटातल्या भुकेच्या वणव्यापुढे मान तुकवावीच लागते.मान,मूल्य,तत्व हे सगळे भरल्या पोटाचे चोचले. उपाश्याला फक्त भूक साद देते बाकीचे आवाज व स्पर्श जाणिवेच्या पलीकडे असतात.आईचा आधार पण तिच्याकडून मूकपने नाकारला गेला होता.आजारपणात पण आईचा मायेचा हात क्वचितच