श्री राम नवमी

  • 6.5k
  • 1.5k

रामनवमी म्हणजे रामाचा वाढदिवस राम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन्‌ लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.राम नवमी’ आपल्यातील दिव्य आत्मप्रकाश प्रकटीप्रित्यर्थ साजरी केली जाते.चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवसाला 'रामनवमी ' म्हणतात. वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातील हा सर्वात मोठा उत्सव. दुष्ट शक्तींना ज्यावेळी भूतलावरील सज्जनांना त्राही भगवान् करून सोडले, तेव्हा या दुष्ट शक्तीच्या निर्दालनासाठी श्रीविष्णूने भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले होते. हा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र. ज्याला पाहून मन रमते, आकर्षित होते, मनुष्य स्वतःला विसरून जातो, मुग्ध होतो, भारावून जातो अशी व्यक्ती म्हणजे राम. या दिवशी प्रभू रामचंद्रांचा