माझी लढाई आजुन संपलेली नाही

  • 8.8k
  • 2
  • 2.5k

'माझी लढाई अजून संपली नाही' मी प्रियांका.प्रियांका रेड्डी... आज मी तुमच्यामधे नाही, पण तुमच्या मधे नाही याचं दुःखही नाही..खरतर मुलगी म्हणून जन्म घेतला तेव्हाच माझ्या संघर्षाची सुरवात झाली... रस्त्यावर येता जाता टवाळखोर मुलांच्या कमेंट, शिट्ट्या, घाणेरडे चाळे सहन करत करत माझ्या निरागस आयुष्याचा शेवट इतका भयानक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कोण होते ते माझा बलात्कार करणारे...? मुसलमान..? हिंदू...? ख्रिश्चन..? बुध्दिस्ट..? शिख...? एका बलात्कार पिडितेला विचाराल तर ते होते केवळ 'लिंगपिसाट पुरूष'.. पण बलात्काराला धर्म जोडून माझ्या बलात्काराचही राजकीय भांडवल करत काही गिधाडांकडून माझ्या मृत्यूनंतरही माझ्यावर बलात्कार केला जातोय..