मला काही सांगाचंय...- १९-१

  • 8.1k
  • 3.4k

१९. स्मृति ती एक एक पान बाजूला सारत वाचत होती .... तोच तिला ते अक्षर कुमारचं असल्याचं लक्षात आलं ... तसं समोर आणखी काय लिहिलं असेल ? स्वतःलाच विचारत तिने पान सरकविले ... पानाच्या मधोमध लिहिलं होतं ..... मराठी शायरीकार माननीय भाऊसाहेब वा . वा . पाटणकर यांच्या ओळी आठवल्या , त्यात जरा भर घालून मन मोकळं लिहायला सुरुवात करतो ... " आजवर इतक्याचसाठी नव्हती आसवं गाळली । गाळायची होती अशी , की नसतील कोणी गाळली । आसवांच्या या धनाला जाणून मी सांभाळिले । आज या विरहाक्षणी यांनीच मला सांभाळिले ।" जरावेळ विचार करत तिने ते पान बाजूला केलं ...