तोच चंद्रमा.. - 5

  • 4.3k
  • 1.3k

जुनी कहाणी त्या चंद्रावरच्या कृत्रिम बागेत हा असा कृत्रिम मानव समोर नि मी माझ्या अकृत्रिम भावना त्याला सांगतोय. म्हणजे त्या माझ्या जुन्या लव्हस्टोरीनी सुरूवात करायला हवी! "तुला लव्हस्टोरी म्हणजे काय हे तर ठाऊक असेल ना राॅबिन?" "आॅफकोर्स! आधी नव्हते माहिती पण आता टीव्हीवरच्या सिरीयल्स बघून शिकतोय मी!" "म्हणजे? तू टीव्ही बघतोस?" "अर्थात. घरी असलो की. त्यात सीरियलचा मुख्य विषयच असतो तो. प्रेमकथा. ती मुख्य कथा तरी असते नाहीतर कुठल्याही कथेचा साईड भाग तरी. एवढे कळलेय मला. अर्थात हे प्रेम म्हणजे काय