मकर संक्रांत भाग २

  • 4.8k
  • 1.9k

मकर संक्रांत भाग २ संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व:- या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तिळ-तांदुळ वाहतात. आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.सुगडात गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची