जुगारी - (भाग - 2)

  • 9.3k
  • 1
  • 4.7k

मागील भागावरून पुढे.....तिच्या बाजूला बसून राज ती शांत होण्याची वाट बघत होता. काहीवेळानी ती शांत झाली. " सॉरी... मी मगाशी खूप जोरात मारली नां ? "" ह्म्म्म... अजून पण डोळ्या समोर काजवे चमकत आहेत.." आपला गाल चोळत तो म्हणाला.. " बघू.." तिने खजील स्वरात म्हंटले. " जाऊदे.... तुझी स्टोरी काय आहे? "" माझी स्टोरी ? " तीने न समजून विचारले. " ह्म्म्म... म्हणजे बघ कोणत्याही धंदेवालीला असे म्हणालो असतो तर तिला राग आला नसता पण तू तर चक्क माझ्या कानाखाली मारलीस म्हणून मला असे वाटतेय कि माझ्या समजण्यात काही चूक झालीय.. "" खरंय तुझे.... त्या बाईला बघितलेस नां मगाशी , ती माझ्या साठी एखादा