चांदणी रात्र - १६

  • 9.9k
  • 2.4k

वृषालीच्या अकस्मात मुत्यूमुळे राजेश पूर्णपणे खचला होता. अजूनही तो धक्क्यातून बाहेर आला नव्हता. त्याचे आईवडील सुद्धा फार काळजीत होते. संदीप आणि मनालीनेसुद्धा राजेशला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण राजेशवर काहीच परिणाम होत नव्हता. त्याला ते स्वप्न आठवत होतं. काही महिन्यांपूर्वी त्याला जे अभद्र स्वप्न पडलं होतं त्याप्रमाणेच सगळं घडलं होतं. मग ते स्वप्न म्हणजे एक प्रकारची पूर्वसूचनाच होती का? राजेशला काहीच समजत नव्हतं. एक दिवस रात्री राजेश त्याच्या खोलीत झोपला होता. खिडकी जोरात आपटल्यामुळे मोठा आवाज झाला व त्या आवाजामुळे राजेशला जाग आली. राजेशने खिडकीच्या दिशेने पाहिलं. एक प्रकाशाचा लालसर गोळा खिडकीतून आत आला. ‘आपण स्वप्नात तर नाही ना’ राजेशच्या मनात