जुळले प्रेमाचे नाते - भाग-२२

(19)
  • 8.3k
  • 1
  • 4.3k

आज लवकरच कॉलेजसाठी निघाले होते.., कारण परत डान्स प्रॅक्टिस चालु करायची होती..अजून निशांत आला नव्हता. म्हणून मी पाहोचून प्रॅक्टिस करत बसले. मी प्रॅक्टिस करत असताना राज ऑडीमध्ये आला.. मला बघत येऊन समोर बसला.. पण माझं काही लक्ष त्याच्याकडे नव्हतं.. मी माझ्याच धुंदीत नाचत असताना पायात पाय येऊन खाली पडलेच... राज धावत माझ्याजवळ आला... "हेय, प्रांजल जास्त लागलं तर नाही ना..??" त्याने उचलत विचारलं. "नाही.., पण पाय दुखतोय. मुरगळला वाटत." मी राजला बोलले. त्याने मला उठवुन खाली आणल, पण मला काही चालता येत नव्हतं. त्याने माझा एक हात त्याच्या हातात घेतला, तर दुसरा माझ्या कमरेत घातला आणि घेऊन जाऊ लागला. तोच दरवाजातून