कॉलगर्ल - भाग 10

(33)
  • 32.6k
  • 3
  • 21k

यश आज सकाळी लवकरच साईटवर आला. पुढच्या आठवड्यात कंपनीचे मँनेजर आणि भारत सरकारचे काही अधिकारी साइटला व्हिजीट देणार होते. त्याची तयारी चालू होती. यश समुद्रात सँम्पल आणण्यासाठी आला होता. अनेक सँम्पल्स घ्यायचे असल्याने त्याला बराच वेळ लागला. यश परत किनाऱ्यावर आला तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. तो केबिनमध्ये जाणार एवढ्यात त्याला बबन पळत येताना दिसला. तो ओरडतच येत होता. “काय झालं बबन? एवढी धावपळ कसली चालू आहे?” “सायबानु, घात झालाय, गोगटे काकूंना नाग डसलाय. बाईसाहेबांनी त्यांना गाडीत घालून रत्नागिरीची वाट धरली हाय. तुम्हाला बी बोलावलंय, तुमचा फोन बंद हाय का?” “मी आत साईटवर होतो, आत्ताच आलोय, चल बस जिप्सीमध्ये.” यशने