जुगारी - (भाग - 3)

  • 8k
  • 4.6k

मागील भागावरून पुढे........ दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे राज गार्डन मध्ये आपल्या नेहमीच्या जागेवर येऊन बसला होता. अण्णा कडून त्याने सकाळीच वळण आणले होते. ते पैसे घेऊनच तो आता इथे बसला होता. आज सुषमा उशिरा येणार होती. तिने कालच त्याला सांगितले होते. काल गडबडीत त्याने तिचा नंबर पण घेतला नव्हता. त्यामुळे तो तसा निवांतच बसला होता. रात्रभर शोधून पण आज त्याला बिलकुल काही गेम निघत नव्हती . बऱ्याच जणांचे फोन आले होते पण गेम नाही म्हंटल्यावर त्यांची निराशा झाली होती. तेव्हड्यात पुन्हा त्याचा फोन वाजू लागला. त्याने काहीश्या त्रासिक चेहऱ्याने मोबाईल उचलला. त्यावर राखी हे नाव फ्लॅश होत होते. ते बघून