#@निनावी नात@#अलीशान मांडव वाडयाच्या दाराशी सजला होता, सनई चौघडे मंद स्वरात वाजत होते, दारावर हार तोरण लावली जात होती. सगळीकडे घाई गडबड चालू होती, आहेर चढ़वायचे चालू होते.पै पाहुणे काही आले होते, काही येत होते, मांडवा समोरचा रोडवर मोठ मोठ्या गाड्यानी गर्दी केली होती. वरबाप सगळ्यांची सरबराई करण्यात मग्न होते,लग्नाची तयारी जोरात सुरु होती, मोठ्या गाडितुन पांढऱ्या कडक खादी कपडयातले पुढारी येत होते, फटाकयांच्या लडीने अख्खा आसपासचा परिसर दनानत होता... मंडपातील स्टेज ला गुलाबाणी सुशोभित केल होत,, कारंज्यामधुन रंगीबेरंगी फवारे उड़त होते, सगळीकडे लखलखाट होता... अहो कारणच तस होत, एका मोठ्या नेत्याच्या मुलीच लग्न