जात

  • 8.7k
  • 2k

सध्याचा गाजणारा मुद्दा कोणता? जात... मला वाटते हा मुद्दा आधीही होताच आणि यापुढेही असाच चालू राहील. अर्थात आपण जर याचे गांभीर्य वेळीच ओळखले तर मात्र तो बराचसा सुसह्य बनेल. सकारात्मक राहायला काय हरकत आहे? असो... ही गोष्ट आहे १९८६ सालातली. त्यावेळी मी सहावीत शिकत होतो. आणि हे तेच वय असतं, ज्यात मुलांवर कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त परिणाम होतो. नुकतेच त्यांना थोडेफार समजू लागलेले असते. जे विचार त्यांच्या समोर मांडले जातील त्यावर लगेचच मुले विश्वास ठेवतात. अनेक गोष्टींचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मुले याच वयापासून चालू करतात. त्यामुळेच या वयात अनुभवलेल्या अनेक गोष्टी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. अशा अनेक घटना