अधिक मास

  • 58.2k
  • 4
  • 8.2k

अधिक मास मराठी कॅलेंडरनुसार ३२ ते ३३ महिन्यांनी एकदा येणारा 'अधिक मास' असतो . चांद्रमास ३५४ दिवसांचा, तर सौर मास हा ३६५ दिवसांचा असतो. त्यामुळे वार्षिक कालगणनेत होणारा ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर अडीच वर्षांनंतर अधिक मास येतो. त्यालाच मलमास, पुरुषोत्तम मास, धोंडा महिना अशी नावेही आहेत. कन्येला महालक्ष्मी मानले असल्याने पुरुषोत्तम मानलेल्या जावयाला ही कन्या विवाहात दान दिलेली असते. अधिक मासात त्याच जावयाला महाविष्णू पुरषोत्तम स्वरूप मानून चांदीच्या तबकात ३३ अनारसे देण्याची प्रथा आहे. दर १८ वर्षांतून एकदा आषाढ अधिक येतो. भाद्रपदामध्ये २४ वर्षांनी, तर चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे १२ वर्षांनी अधिक मास म्हणून येतात चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे