थोड्यावेळाने चहा पिऊन झाल्यावर रिवा आणि राजेश झोपडीच्या बाहेर आले. आता अंधार थोडा कमी झाला होता. काही सूर्यकिरणे झाडांचा अडथळा पार करून जमिनीपर्यंत पोहोचली होती. झाडांच्या फांद्यांना चुकवत मातीला स्पर्श करण्याची जणू त्यांच्यात स्पर्धा सुरू होती. राजेशने समोर पाहिले. पुढच्या बाजूला वेगवेगळ्या आकाराच्या बऱ्याच छोट्या मोठ्या झोपड्या दिसत होत्या. रिवा आणि जांदी सारखा पोशाख केलेले बरेच स्त्री-पुरुष दिसत होते. काही लहान मुलेही होती. रिवाच्या मागून राजेश चालत होता. वाटेतली माणसं राजेशकडे एखादा एलियन दिसल्याप्रमाणे आश्चर्य आणि कुतूहलाने पाहत होती. त्या सर्व लोकांकडे पाहून राजेशला आपण फार उंच असल्यासारखं वाटत होतं. कारण ती माणसं रिवाप्रमाणेच उंचीला कमी होती. विशेष म्हणजे स्त्रियाही