मला काही सांगाचंय... - २१

  • 6.9k
  • 3k

२१. आनंदाश्रू सुजितच्या मनात आलेला प्रश्न तसाच राहीला आणि तिच्या मनातला सुध्दा ... मोबाईल वरचा संवाद संपला ... तिने मोबाईल बाजूला ठेवला , कुमारने डायरीत अजून काय लिहिलं याचं कुतूहल प्रत्येक क्षणाला वाढतच होत ..... मनात येणारे विचार दूर सारून तिने पुन्हा डायरी उघडून वाचायला सुरुवात केली.. ... ... ... कुमारने लिहिलं होतं ... बारावीचं वर्ष ... माझं कॉलेज सुरु झालं होतं आणि तिचं सुध्दा , मग काय सोबतच कॉलेजला जाणं , येतेवेळी सोबतच घरी येणं असा रोजचा दिनक्रम .... आमची मैत्री आणखी घट्ट झाली , तिचा सहवास मला जास्तच आवडायला लागला होता पण मनात प्रेम वगैरे अस काहीएक नव्हतं