छेडीत जाऊ आज प्रीत..

  • 3.7k
  • 1.3k

"निदान भरलेला टीफिन तरी उचलून बॅगेत ठेवत जा..... कसलाच कामात मदत करत नाहीस.." तीच्या डोळ्यात निखार्यांची लाली व मुखात कामाची दगदग आणि नवर्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. सकाळी सकाळी बायकोचं असं रौद्ररूप पाहून मोहन चांगलाच बावचळला होता. नक्की हिला झालेय काय.. हे कळायला थोडा वेळ लागणार होता. म्हणूनच नजर खाली करून त्याने किचनमध्ये प्रवेश केला. तोपर्यंत साक्षीची बडबड चालूच होती. मोहन थोडा घाबरतच टिफीन उचलायला खाली वाकतोच तेवढ्यातच शरणागती पत्करलेल्या हरणावर झडप घालणार्या वाघिणीसारखी साक्षी समोर आली. त्याचा हात पकडून त्याला स्वतःसमोर अक्षरशः फिरवले अन् पुन्हा डरखाळ्या फोडू लागली. "तुला हजारवेळा सांगितलेय तुझं कोणत्या मुलीशी बोलणं मला सहन