पावसाचा वेग कमी झालेला. अमोल सोडून बाकी सर्व एका जागी शांत बसून होते. अमोलचं फोटो काढणं सुरूच होतं. पुजारीने फक्त एकदाच अमोल कडे पाहिलं. नंतर या सगळ्याकडे नजर टाकली. " पहिल्यांदा आलात वाटते तुम्ही.... इथे " ," हो.. तुम्हाला कसं कळलं ते ... " ...संजना " हे महाशय ... ज्याप्रकारे फोटो काढत आहेत त्यावरून... फिरायला आलात वाटते तुम्ही... " पुजारीने चौकशी केली. " हो... फिरायचे तर आहेच.. पण आणखी एका कामासाठी आलो आहोत.. " कोमलने सांगितलं. " असा कोणी व्यक्ती तुम्ही बघितला आहे का... जो या सर्व गावकरी , शेतकरी पासून वेगळा वाटतो. म्हणजे इथला वाटत नाही असा.. दाढी- केस वाढलेले... जो सारखा भटकत