जुगारी - (भाग - 5)

(16)
  • 8.4k
  • 3.8k

मागील भागावरून पुढे...... दुसऱ्या दिवशी तो लवकरच उठला. उठला म्हणण्यापेक्षा त्याला जाग आली असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. अगरबत्तीच्या सुगंधाने त्याला जाग आली होती. त्याने उठून पाहिले तर देवाची साग्रसंगीत देवपूजा झाली होती. देव्हाऱ्यात निरंजन लावले होते . अगरबत्ती लावली होती. त्याने कधीच अशी लवकर उठून पूजा केली नव्हती. त्यामुळे त्याच्या देवाला तरी एव्हड्या लवकर पूजेची सवय होती कि नाही माहित नाही. सुषमा आपले ओले केस टॉवेल मध्ये बांधून किचन मध्ये काही करत होती. " काय चालले आहे ? " त्याने किचन मध्ये येत विचारले. " नाश्ता करतेय.." कांदेपोहे आवडतात ना तुला ? " हो आवडतात... छान दिसतेस आज.." तिला निरखत त्याने पुष्टी जोडली. 'खरंच..."