" Hi .. मी सई .. फोटोग्राफी शकते आहे. मला अशी काही ठिकाणी जायचे आहे , जिथून छान छान फोटो काढता येतील. गावात विचारलं तर त्यांनी तुझं नावं सांगितलं... माहित आहे का तुला.. " आकाश पुन्हा हसला. " कसं असते ना, माणूस एवढा गुंतलेला असतो ना आपल्या विचारात , कि गोष्ट समोर असली तरी दिसत नाही.. " आकाश स्वतःशीच बोलत होता. " what.... ?? means काय समजलं नाही मला... " सईने लगेच बोलून दाखवलं. " एवढं समोर... निसर्ग त्याचं सौंदर्य उधळत असताना, तुम्ही विचारत आहात... कुठे मिळेल चांगलं ठिकाण... " आकाश समोर पाहत बोलत होता. खरंच किती छान होतं ते द्रुश्य.. सई