मला काही सांगाचंय... - २३

(11)
  • 6.9k
  • 1
  • 3k

२३. आठवण एकांतात असल्याने त्या अनावर प्रश्नांनी तिच्या मनावर ताबा मिळवला ... पण तिचा नाईलाज होता कारण गतकाळ आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी एकाकी असतांना जास्त तीव्र होऊन आपला हेतू साध्य करतात ... कधी विसर पडलेला भूतकाळ नजरेसमोर जुन्या आठवणी जाग्या करून मनाची समाधी लावतात ... मनं बिचारं त्या आठवणींचा पाठलाग करत कितीतरी दूर प्रवास करत परत त्या क्षणी जे काय झालं , घडून गेलं , इतिहासात जमा झालं तिथं जाऊन धूळ खात बसलेल्या आपल्याच प्रतिमा , मूर्ती , सुख दुःखाचे जुने सोहळे दाखवतं अन पाहत राहतं .... जणू काही पहिल्यांदाच हे सारं घडत आहे असं समजून पुन्हा ते सारं