विवस्त्र भाग २

(12)
  • 20.7k
  • 13.1k

धावत धावत मी घरात गेले व आतील रूम मध्ये जाऊन रूम लॉक केला आई रुमकडे अचानक धावत आली. "स्मिता काय झालं?? दार का लावले आहे??" मी दबक्या स्वरात काही नाही आई तब्येत ठीक नाही आहे झोपते जरा.. "अग पण तू तर सुधीर सोबत गेली होतीस ना...?? आई ने प्रश्न विचारला "हो" बोलले फक्त आई ला वाटले की सुधीर ने मला घरी सोडून निघून गेला असेल? पण मी मात्र रडत होते.. "मी त्या व्यक्तिला पहिल्यांदा भेटले त्यांनी मला विश्वासात न घेता असे केले ? मला काय वाटेल ह्याचा जरा ही विचार नाही केला.. आणि ही गोष्ट मी कोणाला सांगू ही शकत