पोस्टाचा चेहराच पूर्णपणे बदलून गेला आहे

  • 9.1k
  • 2.3k

पोस्टाचा चेहराच पूर्णपणे बदलून गेला आहे बऱ्याच वर्षांनी पोस्टात काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. आवारात जाता क्षणीच मी अवाक झालो. पोस्ट इतक्या झपाट्याने बदलेल असे स्वप्नात देखील वाटले न्हवते. काळानुरूप पोस्ट बदलले हे पाहून मला देखील खूप बरे वाटले. जी कार्यालये कितीही डिजिटलायझेशन झाले तरी बदलणार नाहीत त्यापैकी पोस्ट असा काहींचा समज होता मात्र तो आज पूर्णपणे खोटा ठरला आहे. ग्रामीण व्यवहारात सर्वात जवळचा संपर्क असलेले कार्यालय म्हणजे पोस्ट. खेडेगावात तर पूर्वी पोस्टमास्टरचा रुबाब काही आगळा वेगळा होता. गावच्या समस्या सोडवण्यात विकास करण्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. माझे वडील पोस्ट खात्यात सेवेला होते. आमची ठिकठिकाणी बदली होत असल्याने मी बहुसंख्य