रुंजीर

  • 5.5k
  • 1.4k

मी तसा कोकणातला लहानपणापासून कोकणाच्या निसर्गात वाढलेलो खेळलेलो बागडलेलो, निसर्गच्या सगळ्या रूपाचा मला अनुभव आहे अन जाणीव पण आहे. आम्हाला निसर्गाने सगळे काही भरपूर दिले असून त्याच्या आम्ही मनमुराद आनंद घेतो, सतत चा पाऊस कधी रिपरिप तर कधी कधी हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार पाऊस सगळे हिरवेगार आंबे, फणस, काजू, नारळ,सुपारी यांच्या समृद्ध बागा, माझी पण कोकणात सुंदर वाडी आंबा,फणस, नारळाणे लगडलेली. टुमदार कौलारू घर छान असा निसर्ग सौंदर्य असताना आम्ही मात्र एवढा सुंदर निसर्ग सोडून पुण्यात नोकरीला तिच धावपळ तेच काम सगळ्या गोष्टीत तीच यांत्रिक पद्धत शनिवार व रविवारच्या सुट्टी साठी आठवड्यातले पाच दिवस रात्रंदिवस काम. तेच तेच टु पंच वन