मला काही सांगाचंय...- २४-१

  • 6.9k
  • 2.9k

२४. अनपेक्षित इकडे या शहरात - जेथे कुमार , त्याचे कुटुंब आणि मित्र परिवार सर्व जण असलेल्या ठिकाणी डॉ . वैद्य यांच्या दवाखान्यात - ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा बंद झाला पण आत कुमार कसा असेल ? ऑपरेशन ठीक होईल ना ? आणखी किती वेळ आहे ? असे प्रश्न सर्वांच्या मनात मागे पुढे येत होते म्हणून तो लाल दिवा बंद झाला आणि त्याचबरोबर ऑपरेशन पार पडलं याची कल्पना कुणालाच नव्हती ... जेव्हा ऑपरेशन थिएटरचे दार उघडून त्याला बाहेर आणले , त्याचे आई वडील , प्रशांत इतर सर्व जण त्या बेडच्या दिशेने जायला लागले ... त्याचे आई वडील जवळच उभे होते म्हणून