अचानक भेटलेले मित्र आणि आठवणी

  • 14.1k
  • 3k

अचानक भेटलेले मित्र आणि आठवणीकधीतरी मार्केटमध्ये चुकून एखादा मित्र - मैत्रीण भेटते.नजरानजर होते आणि मन कनेक्शन्स शोधायला लागत.जुन्या कंपनीतला, शाळेतला, गावाकडचा की कॉलेजमधला मन विचार करायला लागत.चेहरा तर ओळखीचा वाटतो पण बहुदा नाव विसरलेलं असतं.मग आपसूकच कॉलेजच्या रंगीबेरंगी आठवणी जाग्या होतात...कॉलेजचे सुरुवातीचे मयुरपंखी दिवस...सारखं आरश्यात पाहणं अन हेयर स्टाईल सावरणं...मुलींशी बोलताना कचरणारा स्वभाव...अन नंतर आलेला थोडासा धीटपणा...कँटिनमधला वडापाव... टी कॉर्नरचा चहा...बागेतल्या गप्पा... लायब्ररीतला दंगा...कुणाशी खुन्नस... तर कुणाशी पंगा...रूमवर केलेला मित्राचा वाढदिवस...हिसकावून खाल्लेला केक...रडेस्तोवर बसलेले बर्थडे बम्पस...चोरून पाहिलेला पहिला अडल्ट पिक्चर...ते ऑकवर्ड फिलिंग... ती चोरलेली नजर...कॉलेजमधल्या मुली.. अन क्लासमधला सॉफ्ट कॉर्नर...लेक्चर्सला बंक मारणं... बाहेर पोरी पाहत हुंदडणं...तिच्या मागे कधी कॅन्टीन तर