निघाले सासुरा - 3

(12)
  • 10.7k
  • 6.3k

३) निघाले मी सासुरा! सायंकाळचे पाच वाजत होते. दयानंद पंचगिरी यांच्या घरी समाधानाचे आणि प्रसन्नतेचे वातावरण होते. फार मोठ्या प्रतिक्षेनंतर छायाला पसंती मिळाल्याने घरामध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. मध्यस्थाची भूमिका बजावणारे देशपांडे प्राथमिक चर्चेला काही क्षणातच पोहोचणार होते. पंचगिरी दिवाणखान्यात बसून त्यांची वाट बघत असताना घरासमोर थांबलेल्या ऑटोतून साधारण सत्तरीचे एक गृहस्थ उतरलेले दिसताच दयानंद जागेवर उभे राहत आतल्या खोलीकडे बघत म्हणाले,"अग ए... अग... ए बाई, बाहेर या. भाऊजी आले आहेत."तोपर्यंत दयानंदाचे दामोदरभाऊजी दिवाणखान्यात पोहोचले. सर्वांनी त्यांना वाकून नमस्कार केला. तसे दामोदर म्हणाले,"व्वा! तुम्हाला पाहून, भेटून आनंद झाला." तसा आकाश हसत म्हणाला,"मामा, तुम्हाला म्हणजे? आत्याला पाहून आनंद झाला असे