जुगारी (अंतिम भाग )

(33)
  • 6.3k
  • 3.2k

मागील भागावरून पुढे...... मुग्धा च्या येण्यामुळे सुषमा काहीशी बैचेन झाली होती . इथे आल्या पासून ती आता पर्यंत राज आणी ते घर आपलेच असल्यासारखे वागत होती. राज ने पण तिला पूर्ण सूट दिली होती. त्यामुळे ती इथे चांगलीच रुळली होती. त्यांच्यात असे काहीही नव्हते. म्हणून त्यांच्यात शारीरिक समंध सोडले तर ती त्याची बायको असल्याच्या थाटातच सर्व काही पाहत आणी करत होती. त्या बाबतीत तिने राज ला कधीही तक्रार करायला जागा ठेवली नाही. पण आता अचानक मुग्धा आली आणी राज ने तिला आणी पार्थ ला इथे ठेऊन घेतले त्यामुळे आता त्याला आपली गरज नाही असेच तिला वाटू लागले. त्यामुळे तिला एकदा त्याच्याशी बोलून