गाढव प्रेम 

  • 18.7k
  • 3
  • 5.2k

गाढव प्रेम सकाळी गच्चीवर जावून फेऱ्या मारणे, योगा करणे हा माझा नित्याचा क्रम. त्या दिवशी मी असाच सकाळी लवकर उठलो. गच्चीवर जाण्यास निघालो. माझे लक्ष गेटकडे गेले. गेटपाशी एक गाढव अगदी निर्विकार चेहऱ्याने उभे होते. गेटच्या आत येण्याचा जरादेखील प्रयत्न करीत न्हवते. त्याच्या चेहऱ्यावर मला उदासीनता स्पष्ट दिसत होती. बिचारे खाली मान घालून उभे होते. त्याला पाहताच माझ्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. विना तक्रार ओझी वाहणाऱ्या गाढव नावाच्या प्राण्याला खरच आपण योग्य न्याय देतो का? व्यायाम करता करता मी विचारात रममाण झालो. माझ्या समोर त्या गरीब मुक्या प्राण्याचा सारा जीवनपट उभा राहिला. गाढव गरीब बिचारा निमुटपणे ओझी हाकणारा प्राणी.